आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा:15 ऑगस्टपासून सुरु होणार लोकल ट्रेन; दोन डोस घेतलेल्यांना प्रवासात मिळणार मुभा, उद्या टास्क फोर्सची बैठक

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील 26 जिल्ह्यांत शिथिलता

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे दर आणि मृत्यू दर कमी आहे, अशा जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. आतापर्यंत राज्यातील 26 जिल्ह्यांत कोरोना नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहे. सर्वात मोठा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल ट्रेन सुरु केली जाणार आहे.

दोन डोस घेतलेल्यांना प्रवासात मुभा
राज्यात 15 ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल ट्रेन सुरु केली जाईल. परंतु, राज्यातील ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहे, त्यांनाच फक्त लोकल प्रवासात मुभा दिली जाणार आहे. यासाठी एका अॅपची निर्मिती केली जाईल. ज्यांना पास मिळेल त्यांनाच लोकलमध्ये प्रवास करता येणार आहे.

कशी मिळणार पास?

  • लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकलमध्ये प्रवास करता येणार आहे.
  • दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे, त्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे.
  • पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळेल.
  • स्मार्टफोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस मिळतील.
  • स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय असेल.

उद्या टास्क फोर्सची बैठक
राज्यातील हॉटेल, रेस्तराँ, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालयासह इतर बाबतीत नियमात शिथिलता देण्यासाठी उद्या टास्क फोर्सच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील बैठकीमध्ये यावर निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीत काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

'या' जिल्ह्यांत धोका कायम
राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. अतिवृष्टीमुळे काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा आणखी धोका आहे. सांगली, सातारा, कोल्हापुर रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने या जिल्ह्यांत शिथिलता देण्यासाठी 8 ते 10 दिवस लागणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

नीरज चोप्राने देशाची मान उंचावली
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने यावेळी चांगली कामगिरी बजावली. भारताने अनेक वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. सर्वच खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली. परंतु, नीरज चोप्रामुळे भारताला अनेक वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राचा अभिनंदन केले आहे.

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक लोकांचा संसार उघडयावर आला असून यामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरा केला होता. दरम्यान, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यात 26 जिल्ह्यांत शिथिलता
राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 26 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाणे रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...