आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत. आज उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात आहेत. काही नवीन घोषणा ते करतात का? लाइट बील माफीविषयी काही निर्णय घेतला जाणार का? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. ते नेमके काय बोलणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान लॉकडाउनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांचा सामना अनेक करत आहेत. ही बील कमी करण्यात यावीत अशी मागणी जोर धरत आहेत. विरोधकांनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तर, मनसेकडूनही सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देत वीज बिलाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन करु, अशा इशारा दिला होता. यामुळे आजच्या संबोधनात मुख्यमंत्री वीज बिलाविषयी काही बोलणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यासोबत सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शाळा सुरू करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यानुसार मुंबईसह बऱ्याच जिल्ह्यांतील शाळा जानेवारीमध्येच सुरू होणार आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.