आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:विद्यापीठ परीक्षांचा आज फैसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व कुलगुरूंशी बोलणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा घेणे शक्य नाही, अशी भूमिका आता ठाकरे सरकारने घेतली आहे. त्यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अकृषक विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंशी व्हिडिआे काॅन्फन्सिंगने संवाद साधणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला १७ मे रोजी पत्र पाठवून पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून इतरांच्या परीक्षा पूर्वीच रद्द झाल्या आहेत. त्यांना ग्रेड देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व कुलगुरूंशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यापीठीय वर्गाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावर कुलपती म्हणजेच राज्यपाल यांनी मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकार परीक्षांच्या निर्णयावर सावध पावले टाकत आहे.

10 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

सरकारने नेमलेल्या समितीने ‘काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग पाळूनही परीक्षा घेेणे शक्य नाही. तसे केल्यास १० लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षासुद्धा रद्द कराव्यात आणि त्यांना ग्रेड द्यावे’ अशी शिफारस उच्च व तंत्रशिक्षण विभागाला केली.

बातम्या आणखी आहेत...