आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांचा दौरा:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती, औरंगाबाद दौऱ्यावर, समृद्धी महामार्गाची करणार पाहणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील एक प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत.

असा असणार मुख्यमंत्र्यांचा दौरा

 • सकाळी 10.20 वाजता मुंबईहून विमानाने नागपूर विमानतळ येथे आगमन.
 • हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर , मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे प्रयाण.
 • 11.15 वाजता मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव
 • दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे प्रयाण.
 • 2 वाजता गोळवडी हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी व राखीव.
 • दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण.
 • औरंगाबाद येथे आगमन व 3.35 वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील एक प्रकल्प आहे. एकूण 710 किलोमीटरचा हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च यामध्ये लागू शकतो. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser