आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पाणी धोरणाचा शुभारंभ:मी मास्क काढला, आता काही जणांचा मास्क 14 मे रोजी काढणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मास्क काढला आहे आता काही जणांचा मास्क 14 मे रोजी काढणार आहे आणि जाहीर सभेत राजकारणाबद्दल बोलणार आहे असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.

आज मी राजकारणावर बोलणार नाही असे सांगत मुंबईत जन्मलेला महाराष्ट्राचा मी पहिला मुख्यमंत्री आहे असेही ते म्हणाले. कौतुकाची थाप मारणारे कमी असतात, मात्र थापा मारणारे जास्त असतात असा टोलाही मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. ते मुंबईत पाणी धोरण प्रकल्प शुभारंभाप्रसंगी आज सायंकाळी बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

आता आपण माणसात आलोय असे वाटते आहे. कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे बऱ्याच दिवसांनी मास्क काढला. तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे. आताचा कार्यक्रम हा महापालिकेचा आहे. सर्वांसाठी पाणी देण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या राजकारण आणून पाणी गढूळ करणार नाही. प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.

14 मे रोजी जाहीर सभेत बोलणार - मुख्यमंत्री

14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मी पक्का मुंबईकर आहेच, मुंबईत जन्मलेला राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. याचा मला जास्त अभिमान आहे. 1 मे ला 62 वर्ष झाली, महाराष्ट्राच्या संयुक्त लढाईत आमचे आजोबा होते. लहानपणापासून आम्ही मुंबई आम्ही कशी बदलत आली हे पाहत आलोय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...