आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता ते महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील. सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट हे प्रकरण पेटलेलं आहे. तसेच कोरोना काळात मंदिर अद्यापही उघडलेली नाहीत. याविषयी ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं आहे.
सीएमओ महाराष्ट्रच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजवरुन उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधतील. दरम्यान नुकतंच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली यानंतर एक गदारोळ पाहायला मिळाला. यामध्ये शिवसेनेच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच कंगना सातत्याने शिवसेनेला टीका करुन चिथवण्याचा प्रयत्न करत आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठा आरक्षणाविषयी करु शकतात भाष्य
दरम्यान नुकताच सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय देत आरक्षणाला स्थगिती मिळाली दिली. या प्रकरणी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आता या सर्व विषयावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धार्मिक स्थळे कधी उघडणार?
यासोबतच सध्या राज्यातील लॉकडाऊन नसले तरी अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिरांचा समावेश आहे. विरोधकांकडून सातत्याने मंदिर खुली करण्याची घोषणा केली जात आहे. हे टप्प्याटप्प्याने उघडणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. आज ते याविषयी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.