आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंची मोदींकडे मागणी:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, राज्यासाठी वेगळे लसीकरण अॅप सुरू करण्यासाठी मागितली परवानगी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.

राज्यातील कोरोना प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतानाच दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. दरम्यान 1 मेपासून 18 वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे.याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे महत्त्वाची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.

लसीकरण अॅपवर नोंदणीपासून लसीचा पहिला डोस घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. तसेच नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात अॅपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून राज्यासाठी नवीन अॅप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी या पत्रामध्ये लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...