आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत जाहीर सभा, शिवसेनेचे एमएमआरडीएच्या मैदानावर शक्तिप्रदर्शन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

१४ मेच्या सभेत मास्क काढून बोलणार असून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे शनिवारच्या (१४ मे) मुंबईतील जाहीर सभेविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दादागिरी मोडून कशी काढायची हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले आहे, असा इशारा देत उद्धव ठाकरे यांनी या सभेत काय बोलणार याचे संकेतच दिले आहेत.

शिवसेनेच्या या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी १५ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. ते या सभेतून ठाकरेंना उत्तर देतील. शनिवारी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेचा जाहीर मेळावा होणार आहे. भोंगे, हनुमान चालिसावरून शिवसेनेच्या हिंदुत्वाला राज ठाकरेंनी दिलेले आव्हान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी १ मेच्या सभेत उद्धव ठाकरे व शिवसेनेला उद्देशून केलेली टीका या मुद्द्यांवर मुख्यमंत्री सर्वांचा समाचार घेतील, असे अपेक्षित आहे.