आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

'सामना' मुलाखत:मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देतात असा काँग्रेसचा आरोप, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सरकारचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप देतात असा एक आरोप काँग्रेसकडून होतो. या प्रश्नाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सामनाच्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे. खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीला झुकतं माप देतो म्हणजे काय करतो हे तरी सांगा? आता झुकतं माप देतात म्हणजे काय करता? त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झाला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे मुख्यमंत्री या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, 'राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं जातं हा एक प्रेमळ आक्षेप काँग्रेसने सुरुवातीला घेतला होता. हा आक्षेप भेटल्यानंतर दूर झाला आहे. तो आक्षेप मात्र काही जास्त तीव्र नव्हता. शेवटी असं आहे की सगळेजण निवडणूक लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात म्हणून तर जनता मतं देते. त्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकत नसू असं कुणाला वाटत असेल तर ती त्यांची चूक नाही. त्या आशा-अपेक्षा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही. मी याला काही आक्षेप असं नाव देणार नाही. मात्र सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात असं काही असेलही.. मला त्यांनी तसं ठामपणे सांगितलं नाही. माझं पवारसाहेबांशीही चांगलं पटतं, नित्य नियमाने नाही पण सोनियाजींनाही मी फोन करत असतो.'