आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिसेस मुख्यमंत्री रुग्णालयात:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे HN रिलायन्स रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वीच झाली होती कोरोनाची लागण

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज त्यांनी दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रश्मी ठाकरे यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आणले असल्याची माहिती होती. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच काळात कोरोना विषाणूने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचे पूत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रश्मी ठाकरे या होम क्वारंटाइन झाल्या होत्या. मात्र आता त्यांना खोकल्याचा त्रास होत आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. जेजे रुग्णालयामध्ये त्यांनी पहिला डोस घेतला. मात्र याच्या काही दिवसांनंतरच रश्मी ठाकरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...