आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची घोषणा:पडलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 300 रु. सानुग्रह अनुदानाचा टेकू; 600 रु. देण्याची शेतकऱ्यांची मागणी

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारातील मागणीअभावी कांद्याचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. दरम्यान, कांदा अनुदानासह इतर मागण्यांसाठी विधानभवनाकडे निघालेल्या शेतकरी मोर्चातील माकप नेत्यांनी कांद्याला प्रतिक्विंटल ६०० रुपये, तर काँग्रेसने ५०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.

कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यास कांदा विक्रीनंतर अवघा दोन रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचा प्रश्न गाजला होता.

बातम्या आणखी आहेत...