आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची घोषणा, राज्यभर उपक्रम:सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिन राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम गौरवदिनी आयोजित करण्यात येणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वीर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये वीर सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तरुण पिढीला त्यांच्या देशभक्ती, धैर्य आणि प्रगतिशील विचारांना पुढे न्यायचे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस साजरा करणे आवश्यक आहे, असे मंत्री सामंत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.