आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:आरोग्य विभागात 8500 पदे भरण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी, आरोग्य विषय वेबिनारमध्ये राजेश टोपे यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदांपैकी ५०% (८५००) पदे भरण्याची अनुमती दिली आहे. आगामी कालावधीत ही पदे भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

राज्यातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. कुणालाही रक्तासाठी रक्कम मोजावी लागणार नाही यासाठी निर्णय विचाराधीन असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सामान्य जनतेचा सार्वजनिक आरोग्यसेवेवरचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न सुरू असून राज्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात ५०० नवीन रुग्णवाहिका दाखल होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

एका वेबिनारमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. या वेळी नर्सिंग संवर्गातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट नवीन रूपात तयार करण्यासाठी अभ्यास समिती नेमावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केल्या.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser