आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमन कबर वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले - जे चुकीचे आहे, त्यांच्यावर कारवाई होईलच

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस त्यांचे काम करतायत. जे काही चुकीचं झालं आहे, त्याच्यावर कारवाई होईल, अशी सूचक प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकूब मेमन कबर वादावर दिली आहे.

सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजत असलेल्या या प्रकरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच बोलले आहेत.

मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकूब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे वृत्त काल समोर आले होते. यावरून भाजप आक्रमक झाली असून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.

दिवसभर बोलले नाहीत

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजत असलेल्या याकूब मेमन प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला विशेषतः शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते आशिष शेलार यांनी तर पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. मात्र गुरुवारी दिवसभरात मुख्यमंत्र्याकडून याबाबत एकही प्रतिक्रिया समोर आली नव्हती.

पोलिस तपास करत आहेत

फडणवीसांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे चुकीचे आहे त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र, कोणावरही खासकरून उद्धव ठाकरेंचे त्यांनी नाव घेतले नाही. या वादावर त्यांनी जास्त बोलणे टाळले.

शिंदेंच्या गोटातून तीव्र प्रतिक्रीया

दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, उद्या बलात्कार आणि खुन करणाऱ्यांच्या कबरी बांधल्या जातील. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. मागच्या सरकारचा जो चांगुलपणा होता. त्याचा आम्हाला त्रास होत होता. याच कारणामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो. आमची आणि आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे की, हे जे काही बांधकाम सुरु आहे ते अत्यंत चुकीचे आहे. आणि ते व्हायला नको.

बातम्या आणखी आहेत...