आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा:ठाण्यातील उल्हासनगरमध्ये निष्काळजीपणे 'स्वॅब स्टिक' बनवताना कॅमेऱ्यात कैद झाली लहान मुले आणि महिला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या घटनांमध्ये RT-PCR किटबाबत एक मोठा हलगर्जीपणा दिसून आला आहे. ठाण्यातील उल्हासनगरात कोविड टेस्टिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'स्वॅब स्टिक'ला निष्काळजीपणाने तयार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या स्टिकला लहान मुले आणि काही महिला निष्काळजीपणाने बनवताना आणि पॅक करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्टिक्स पॅक करून काही नामांकित कंपन्यांना दिल्या जात आहेत. या कंपन्या आपला लोगो त्यावर लावतात आणि बाजारात महागड्या किंमतीत विकतात.

या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये महिला आणि मुले विना मास्क आणि ग्लोव्हज न घालता हे बनवताना दिसत आहेत. जवळपास स्वच्छतेचीही दखल घेतली जात नाही. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, या टेस्ट किटचा वापर केल्यानंतर येत असलेला अहवाल किती बरोबर असेल? एक प्रश्न असाही आहे की, किट बनवत असलेल्या व्यक्तीला कोरोना असेल तर अशा किटमुळे इतरांमध्ये संसर्ग पसरणार नाही का?

किट बनवणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई केली जाईल
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी या भागाची तपासणी केली. महामंडळाचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. किट तयार करणाऱ्या कंपनीचा परवाना देखील रद्द केला जाईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...