आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक द चेन:18 वर्षांखालील मुलांना मॉल प्रवेशासाठी ‘आयडी’ आवश्यक; ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शॉपिंग मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी

राज्यातील १८ वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधांसाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने सोमवारी सुधारणा केली. राज्यात १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या लसीकरणास अद्याप सुरुवात न झाल्याने १८ वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक असणार आहे, असे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...