आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपी विमानतळ उद्घाटन:मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर, दोघांच्या खुर्च्या आजुबाजुला; एकमेकांशी संवाद साधणार का?

सिंधुदुर्ग8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिपी विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन दुपारी 12 वाजता होईल.
  • उद्घाटनावेळी कोणतेही राजकारण करणार नाही - नारायण राणे

कोकणातील नागरिकांसाठी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. आज सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. यावेळची सर्वात महत्त्वाचे वृत्त म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांची खुर्ची एकमेकांच्या आजुबाजुला असणार अशा चर्चा आहेत. यामुळे आता हे दोन्ही नेते एकमेकांसोबत संवाद साधणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

कोकण रेल्वे नंतर कोकणच्या विकासामध्ये चिपी विमानतळाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेमचेंजर तसेच गोवा विमानतळाला पर्याय म्हणूनही सध्या चीपी विमानतळाकडे पाहिले जात आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखिल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. चिपी विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचे आगमन दुपारी 12 वाजता होईल.

या विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब यांची उपस्थिती असणार आहे.

उद्घाटनावेळी कोणतेही राजकारण करणार नाही
नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दरम्यान हे दोघे आज एकाच व्यासपीठावर येतील. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. मात्र आता ते बॅकफूटवर गेले असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आमच्याकडून घडणार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...