आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे-राणे एकाच व्यासपीठावर:नितेश राणेंचे आणखी एक फिल्मी ट्विट; चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी म्हणाले- 'हिसाब तो जरूर होगा', यापूर्वी मारले होते सत्या, राजनिती चित्रपटांतील डायलॉग

सिंधूदुर्ग17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिपी विमानतळाच्या श्रेयावरुन सध्या राजकारण सुरू आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा सर्वश्रृत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. आज सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. यामुळे आज हे दोघे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यापूर्वी नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी सूचक ट्विट केले आहे. 'हिसाब तो जरूर होगा' असे ते ट्विट करत म्हणाले आहेत. यामुळे आजच्या कार्यक्रमात नेमके काय याची सर्वांना उत्सुकता आहे.

यापूर्वीही त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना उत्तर देताना सत्या चित्रपटातील मौका सबको मिलता है आणि राजनिती चित्रपटातील करारा जवाब मिलेगा यासारखी डायलॉगबाजी केली होती.

चिपी विमानतळाच्या श्रेयावरुन सध्या राजकारण सुरू आहे. या विमानतळाबाबत शिवसेनेने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली आहे. तर नारायण राणे देखील या विमानतळाचे श्रेय घेत असल्याचे दिसत आहे.यावरुन नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेनेला दम भरला आहे. ते म्हणाले की, 'ही तीच शिवसेना आहे, जिने चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागली होती. आज त्याच शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्याचे सौजण्य देखील दाखवलेले नाही. अशी आहे ही 'उद्धव सेना'. पण हा फक्त काही काळाचा प्रश्न आहे. हिसाब तो जरूर होगा!' असे नितेश राणे म्हणाले आहेत.

माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतेय
दरम्यान नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधला. माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा अभिमान वाटत आहे. तसेच कोकणातील जनतेला माहितेय की, हे त्यांच्या दादांनी केलेले आहे. तसेच बाळासाहेबांचा मुलगा आमच्या राणे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी येतो हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे. असेही नितेश राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...