आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा:चिपी परुळे विमानतळ शुभारंभ सोहळ्यास सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर; एकमेकांकडे पाहिले देखील नाही!

सिंधुदुर्ग7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे- राणे एकाच व्यासपीठावर

सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर असल्याचे पाहायला मिळत आहेत. दोघांची खुर्ची देखील आजुबाजूलाच ठेवण्यात आली आहे. या दोघांनी दिपप्रज्वलन केले. मात्र एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखिल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी आहेत.

राणे-ठाकरेंनी एकमेकांना नमस्कारही केला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रृत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यातील वादाचा अनुभव आहे. आज अनेक वर्षांनंतर दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत. दरम्यान या दोघांमध्ये संवाद होणार का? याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र दोघांनी एकमेकांना नमस्कारही घातलेला नाही. एकमेकांच्या बाजुला बसून देखील या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

शेवटी पायगुण असावा लागतो, आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होत आहे
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाषण करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा केला. यावेळी ते म्हणाले की, अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाला असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन होत आहे. यासोबतच या विमानतळासाठी खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासोबतच सर्वांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार होत असल्याचे देसाई म्हणाले.

उद्घाटनावेळी कोणतेही राजकारण करणार नाही
शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. मात्र आता ते बॅकफूटवर गेले असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कार्यक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आमच्याकडून घडणार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...