आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत चीन सीमेवर रस्ता बनवण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व माजी सैनिकि मुलांचे वसतीगृह चिपळुणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते. त्याचवेळी सततच्या पावसामुळे २४ मार्च रोजी सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यात सुभेदार अजय ढगळे व त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले. ते मातीच्या व बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. याची माहिती मिळताच भारतीय सेनेने सहा दिवस त्यांना शोधले आणि अथक प्रयत्न करून भल्या मोठ्या चिखल दगड बर्फाच्या खाली असलेल्या अजय ढगळे व इतर चार जवानांना बाहेर काढले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.