आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकीनाका बलात्कार प्रकरण:पीडित महिलेच्या मृत्यूनंतर चित्रा वाघ भावूक, म्हणाल्या - 'आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाल्या चित्रा वाघ?

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने आज दुपारी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात आपला शेवटचा श्वास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी आज राजावाडी रुग्णालयाला भेट देत पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
सदरील घटनेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना भावना अनावर झाल्या होत्या. 'आम्ही भाषणाच्या पलिकडे काही करू शकलो नाही, ही हार आहे आमची', अस त्या म्हणाल्या. चित्रा वाघ यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, "साकीनाका पीडितेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर... लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना, नाही वाचवू शकलो तुला."

संपूर्ण प्रकरण काय?
साकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे समोर आले होते.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.

महिलेच्या खासगी अवयवात जखम
डॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...