आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी जबाबदारी:भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले पत्र

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पत्र वाघ यांना दिले.

चित्रा वाघ यांची भाजपच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख आहे. त्यांनी महिला अन्याय, अत्याचार प्रकरणी अनेकदा आवाज उठवला आहे. विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यातही त्या आघाडीवर असतात.

पत्रात उल्लेख काय?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपली भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भा.ज.पा. महिला मोर्चाचे संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे. आपल्या आगामी कार्यास माझ्या शुभेच्छा.

पंकजांना डावलल्याची चर्चा

भाजपमध्ये चित्रा वाघ यांचा आलेख चढता राहिला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची वेगळी ओळख होती. आता भाजपमध्ये आल्यानंतरही त्यांनी इथेही वेगळी ओळख निर्माण केली. पक्ष अडचणीत असताना धावून जाणे, समोरच्याशी चार हात करणे हे चित्रा वाघ यांचे गुण. त्यामुळेच त्यांच्याकडे आज ही मोठी जबाबदारी चालून आलीय. मात्र, दुसरीकडे पंकजा मुंडे यांना डावलले आहे का, अशी चर्चाही सुरू झालीय. मात्र, पंकजा राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. त्यामुळेही त्यांना ही जबाबदारी दिली नसल्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...