आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (३ नोव्हेंबर) वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा केली. उमा खापरे विधान परिषदेवर निवडून आल्याने महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी वाघ यांना संधी देण्यात आली आहे. वाघ यांच्या नेतृत्वात पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...