आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलेलो आहोत. तुम्ही म्हणजे आयोग नाही, एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्त्युतर दिले. अशा 56 नोटीसा मला आल्या आहेत. त्यात आणखी एक भर पडली, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
मॉडेल उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून सुरू झालेला वाद आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेतल्यानंतर शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यावर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आयोग म्हणजे अध्यक्षासह सदस्य असतात. महाराष्ट्राचे डीजी आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का? मुंबई पोलिस आयुक्तांनी दखल घेतली नाही, हे कशाच्या आधारावर सांगता, असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच महिला आयोगाचे अध्यक्षपदी आतापर्यंत अनेकांनी कामे केली. पण कोणीही अशा विकृतीला खतपाणी नाही घातले. तुमच्यामध्ये असे काय आहे. ज्यामुळे आम्ही आकस करावा, असे म्हणत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
चित्रा वाघ यांना नोटीस
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतल्याचेही चाकणकर यांनी म्हटले. येथे वाचा संपुर्ण बातमी.
उर्फी जावेद-चित्रा वाघ वादावर अजित पवारांची मिश्कील प्रतिक्रिया
चित्रा वाघ-उर्फी जावेद वादात सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. एकूणच संपूर्ण वाद महिलांमध्येच सुरु आहे. मात्र आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे महिला महिलांच चाललं आहे. आम्ही कोणी यात भाग घेतला का? आम्ही महिलांना संधी देतो. त्याची राख करायची का सोन हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, असे म्हणत अजित पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.