आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचाराविरोधात पुढे येत तक्रार द्या:जालना सामूहिक बलात्कार घटनेनंतर चित्रा वाघ यांचे आवाहन; म्हणाल्या - सरकार सोबत आहे

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध देत सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढत महिलेला वर्षभर ब्लॅकमेल करण्यात आले. इतकेच नाही तर आता हे व्हिडिओ थेट तिच्या पतीलाही पाठवण्यात आले. हा व्हिडीओ पाहून धक्काने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच अशा अत्याचाराविरोधात पुढे येत पोलिसांमध्ये तक्रार करा. सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वासही दिला आहे.

वर्षभरापासून ब्लॅकमेल

चित्रा वाघ म्हणाल्या, जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली. वर्षभरापूर्वी एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यावेळी काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. यानंतर गेले वर्षभर या महिलेला विविध प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले.

सहन करू नका

प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या की, मला महाराष्ट्रातील सर्व मैत्रिणींना, माय-माऊलींना, भगिणींना सांगायचे आहे की, अन्याय, अत्याचार झाला तर सहन करू नका. पुढे या आणि पोलिसांकडे तक्रार करा. सरकार तुमच्यासोबत आहे, पोलिस तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे कसलीही भीती न बाळगता पुढे येऊन गुन्हा नोंद करा.

पीडितेच्या पतीचा मृत्यू

चित्रा वाघ म्हणाल्या की, अत्याचाराच्या वेळी काढलेले व्हिडीओ आणि इतर संभाषणाच्या क्लिप्स पीडित महिलेच्या पतीला पाठवण्यात आले. त्या धक्क्याने पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला.

घटना टळला असती

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र झालेली घटना वाईटच आहे, वर्षभरापूर्वी त्या महिलेसोबत ही घटना घडली तेव्हाच तत्काळ त्यांनी गुन्हा नोंदवला असता तर आजचा अनर्थ टळला असता असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...