आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला आयोगाचे सार्वजनिक ठिकाणी, भर रस्त्यात उघडे-नागडे फिरायला समर्थन आहे का ?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना केला आहे.
उर्फी जावेदच्या वेशभूषेवर चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रात रान उठवले आहे. त्या रोज हा विषय मांडत आहेत. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी उडी घेतली. त्यानंतर वाघ यांनी त्यांना उत्तर दिलेच, पण आता त्यांनी आपला मोर्चा चाकणकर यांच्याकडे वळवला आहे.
आता कृती हवी
चित्रा वाघ यांना एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्या म्हणतात, महिला आयोगाची भाषा नको, तर कृती हवी आहे. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उघडे नागडे फिरणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अतिशय बिभित्सपणे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी फिरते आहे. महिला आयोगाने याचा जाब का नाही विचारला?, असा सवाल त्यांनी केला.
विकृतीला विरोध
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाहीच. तिच्या उघड्या-नागड्या बिभत्स अशा घाणेरड्या, ओंगळवाण्या, किळसवाण्या विकृतीला आहे. आणि ज्या पद्धतीने काल महिला आयोगाची भूमिका मांडली गेली. याचा अर्थ उघड्या-नागड्या फिरण्याला महिला आयोगाचे समर्थन आहे का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
कायदा काम करेल
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, कायदा कायद्याचे काम करणारच आहे. आमचे शिंदे-फडणवीस यांचे सरकार सक्षम आहे. सरकार सरकारचे काम करेल. कायदा कायद्याचे काम करेल. महिला आयोग यावर काही काम करणार आहे की नाही. याची स्पष्टता त्यांनी महाराष्ट्राला द्यावी, असे उत्तर त्यांनी मागितले आहे.
नंगानाच चालू देणार नाही
चित्रा वाघ पुढे म्हणतात की, उर्फी जावेदसारखा अशा पद्धतीचा नंगनाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि उघडे-नागडे सार्वजनिक ठिकाणी फिरणे ही आमची संस्कृती नाहीच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.