आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका विधानाने भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली. माध्यमांना प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे विधान केले. त्यावर चित्रा वाघ यांनी ''रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले. मुर्ख समजू नका" असे म्हणत संताप व्यक्त केला.
चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. याशिवाय त्यांनी दोन ट्विट करीत संताप व्यक्त केला आणि व्हिडिओही जारी करीत त्यांनी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, ''रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील याचे दर्शन आज महाराष्ट्राला झाले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महु येथे जन्म झाला. इतके सामान्य ज्ञान असू नये. आमचे आदर्श असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहीती देऊन तुम्ही काय मिळवत आहात. अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चे पण तुम्हीच काढायचे. मुर्ख समजू नका, महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे. तुमचा जाहीर निषेध.''
संजय राऊतांचे ते विधान
संजय राऊत म्हणाले, ''लोकशाहीमध्ये असे घडू नये, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रात घडत आहे. ज्या महाराष्ट्रात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ज्याने लोकशाही जन्माला घातली..''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.