आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राउतांवर भडकल्या चित्रा वाघ:संजय राउत तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध? आधी ते सांगा! राउतांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या चित्रा वाघ शिवसेना खासदार संजय राउत यांच्यावर संतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करून संजय राउत यांना सुनावले. प्रत्यक्षात संजय राउत यांनी एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. त्यांचा आणि शिक्षणाचा काय संबंध? असे राउत म्हणाले होते. त्यास उत्तर देताना, तुमच्या चमचेगिरी आणि संपादक पदाचा काय संबंध? आधी हे सांगा मग मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन असे चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

संजयजी राऊत काल तुम्ही स्मृती इराणी यांच्याबद्दल जे बरळलात… मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा, मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन. असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या, आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते.

कधी नव्हे ते खरे बोललात
केंद्रात झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात नारायण राणे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी राणे यांची उंची त्यांना मिळालेल्या मंत्रिपदापेक्षा मोठी असल्याची टिंगल केली होती. त्यावर सुद्धा चित्रा वाघ यांनी उत्तर दिले. नारायण राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असे कधी नव्हे ते तुम्ही खरे बोलला आहात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहील. म्हणूनच तर ते शिवसेनेला झेपले नाहीत. असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा चिमटाही देखील चित्रा वाघ यांनी काढला.

काय म्हणाले होते संजय राउत?
संजय राउत यांनी एका कार्यक्रमात स्मृती ईराणी यांच्यावर भाष्य केले होते. शिक्षणाचा खेळखंडोबा झाला, या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचे नाव धर्मेंद्र प्रधान आहे. ते चांगले आहेत. कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते कधी शाळेतच गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळाले की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक आपले शिक्षण खाते सांभाळायचे. त्यामुळेच तर शिक्षणाच्या आयचा घो हा चित्रपट आला होता असे संजय राउत म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...