आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही:चित्रा वाघ यांचा इशारा अन् सवालही, उर्फी जावेदसारखा महिला आयोगही बेफाम झालाय का?

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला आयोगाने महिलांचा सन्मान जपायला हवा परंतु महिला आयोग सुमोटोही दाखल केली नाही. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला.

विकृतीला जबाबदार नाही

चित्रा वाघ म्हणाल्या, अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी ओंगळवाणे प्रदर्शन केल्याचा व्हिडीओ एका महिलेने मला दाखवला. दीड वर्षांपुर्वी या महिलेची मुलगी घाणेरड्या विकृतीला बळी पडली असे तिने मला सांगितले व या विकृतीला कुणी जाब विचारणार की नाही असे म्हटले. त्यानंतर आम्ही हीच भुमिका घेतली. आता आम्ही हा नंगानाच चालू देणार नाही.

उर्फीला नव्हे विकृतीला विरोध

चित्रा वाघ म्हणाल्या, विरोध धर्माला नाही परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुूरु आहे त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही तर तिच्या नंगा नाचला विरोध आहे. कुणी काय कपडे घालावे आणि कुणी घालू नये. यावर काय बोलावे. आधी कपडे तर घाला मग ठरवा.

पुन्हा बरळली उर्फी जावेद!:'माझा नंगा नाच असाच सुरू राहणार' म्हणत चित्रा वाघ यांना लगावला जोरदार टोला

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिला धारेवर धरले आहे. उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत जिथे दिसेल तिथे तिचे थोबाड रंगवणार, असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी तिला दिला आहे. पण या धमकीला उर्फी मुळीच घाबरलेली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती माझा नंगा नाच असाच सुरू राहणार असे बरळली आहे. असे बिनधास्त वक्तव्य करत तिने चित्रा वाघ यांना जोरदार टोलाच लगावला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. (येथे वाचा सविस्तर)

ही संस्कृती आहे का?

चित्रा वाघ म्हणाल्या, समाजाचे स्वास्थ महत्वाचे आहे. तिथे राजकारण करायची गरज नाही. पण तसे राज्यात झाले नाही. राज्यात सार्वजनिक ठिकाणी नंगा नाच सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचे उत्तर उर्फीला समर्थन करणाऱ्यांनी द्यावे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार झालाय. असला नंगा नाच चालू देणार नाही.

उर्फीवर कारवाई का नाही?

चित्रा वाघ म्हणाल्या, ही भुमिका घेतल्यानंतर उड्या पडणे साहाजिकच होते. अधिकारपदावर बसलेल्या महिला काय म्हणतात ते मी सांगते. कुणी काय कपडे घालायचे हा ज्याचा त्याचा अधिकार महिला आयोग याबाबतीत वेळ वाया घालणार नाही. महिलांचा सन्मान जपणे, सन्मान राखणे हे काम परंतु, महिलांची इभ्रत, इज्जत,उघड्या फिरणाऱ्या महिलांना जाब विचारावा वाटत नाही. महिला आयोगाने सुमोटात दखल का घेतली नाही. कारवाई का केली नाही. हेअरिंग घेणे ते कामच महिला आयोगाचे आहे.

महिल आयोग बेफाम झालाय का?

चित्रा वाघ म्हणाल्या, अश्लील गोष्टी आणि कृतीवर महिला आयोग दखल घेत नसेल तर महिला आयोगावर बसण्याचा कुणाला अधिकार नाही. उर्फीसोबत महिला आयोगही बेफाम झालाय का? स्वैराचाराला लगाम घालणे ही नैतिक जबाबदारी पण महिला आयोग ती विसरत आहे का, समाजात चुकीचे घडत असेल तर त्याला वाईटपणा घ्यावा लागतो व मी ते करीत आहे.

चित्रा वाघ VS उर्फी जावेद:"मी स्वत: जीव तरी देईन", चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल; वाचा आतापर्यंत काय घडले

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद शमताना दिसत नाहीये. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तर उर्फीदेखील त्यांना सातत्याने प्रत्यूत्तर देताना दिसतेय. उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी महिला आयोग उर्फीची दखल का घेत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे. तर उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे. (येथे वाचा सविस्तर)

म्हणून मी बोलतेय

चित्रा वाघ म्हणाल्या, पोस्टरमुळे अंगप्रदर्शन होते व त्यामुळे समाजमनावर परिणाम होतो हे महिला आयोग एकीकडे सांगते. एका पोस्टरची दखल घेणारा महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावर चालणाऱ्या नंगा नाचाबाबत महिला आयोग दखल का घेत नाही. हेच सांगायला मी आलेय.

महिला आयोग तोंडावर आपटतेय

चित्रा वाघ म्हणाल्या, कुठल्या महिलांना पीडीतांना न्याय द्यायचाय तर केंद्राकडे दाद मागा मी म्हणते का? महिला आयोगाने हात टेकले काय तुमच्या पक्षाने महिला आयोगावर तुम्हाला बसवले याची स्पष्टता द्या. अ‌ॅडव्हायझर चुकीचे सल्ले देत असल्यानेच महिला आयोग तोंडावर आपटत आहे. महिला आयोगाचे पद संविधानिक आहे ती व्यक्ती नाही. ती ऑथोरिटी आहे व ती तोंडावर पडत नसेल तर राज्यासाठी योग्य नाही.

धर्माचा, उर्फीचा नाही विषय नंगटपणाचा

चित्रा वाघ म्हणाल्या, धर्माला व उर्फीला विरोध नाही. नंगा नाचला विरोध आहे. हा राज्यात चालू देणार नाही. धर्माबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून आरोप होत आहेत. चोवीस तास हिंदु मुस्लिम वाद राष्ट्रवादी काॅंग्रेस करतो. धर्माचा, उर्फीचा नाही विषय नंगटपणाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...