आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Chitra Wagh's Criticism Of Thackeray Left Seniors Behind And Made Mercedes Bay A Minister; Thackeray's Filial Love Did Not End And The Chair Of Power Did Not Leave

चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका:ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅायला मंत्री केले; ठाकरेंना पुत्रप्रेम संपत नव्हते अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केले,स्वत: मुख्यमंत्री झाले. यातून पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोला चित्रा वाघ यांनी शिवसेनेला लगावला आहे. सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेच्या प्रेमापोटी आंधळे झालेले धृतराष्ट्र आहेत, असा हल्लाबोल केला होता. यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना ट्विटमधून प्रतिउत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांचे ट्विट?

पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने मागील अडीच वर्षात पाहिले आहे.शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केले आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले.पुत्रप्रेम संपत नव्हते अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडले असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंना लगबावला आहे. शेवटी पक्षातच महाभारत घडले, आता तरी धृतराष्ट्राने डोळ्यावरची पट्टी काढावी, डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा. असा सल्लाही चित्रा वाघ यांनी ठाकरेंनला दिला.

सुषमा अंधारेंवर टीका
कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसाने आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केले आहे.

अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार.. नुकतेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावे असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्ष पणे अंधारेंना लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...