आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:चतुर्थ श्रेणी कर्मचारी आज संपावर, संपकऱ्यांना राज्य सरकारचा कारवाईचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडेतीन लाखांहून अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २९) राज्यव्यापी संप पुकारला आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प होणार असल्याचा इशारा राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती कामगार महासंघाने दिला आहे. दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांना संप करण्यास कायद्यानुसार प्रतिबंध असून संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

संघटनेच्या मागण्या अशा : वर्ग ४ ची पदे निरसित करू नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थ श्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसा हक्काची पदे तत्काळ भरावीत, अशा विविध स्वरूपाच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...