आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात विद्यार्थ्यांना खूप मोठा अडचणींचा सामाना करावा लागला. दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. दरम्यान विद्यार्थी नव्हे तर शाळा व्यवस्थापनांवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. मागच्या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता कमी प्रमाणात नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते, मात्र आता पहिल्यांदाच दहावीचे वर्ग लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणानुसार शाळांवरही निर्बंध येत होते. मात्र आता रुग्णसंख्या घटल्यामुळे आणि निर्बंधही शिथिल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेण्याचे ठरवण्यात आले आहे. स्टेट बोर्डातील शाळांमध्ये एप्रिल महिन्यातच दहावीचे वर्ग सुरु करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना फक्त मे महिन्यात असणार सुट्टी
नववीची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल 27 एप्रिल रोजी जाहीर होतील. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा 1 जून पासून सुरु होईल, अशी माहिती सायन स्कूलच्या मुख्याध्यापकांनी दिली. स्टेट बोर्डाशिवाय असलेल्या सीबीएसई आणि सीआयएससीई बोर्डाच्या शाळांचेही नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. या शाळांचे वर्गदेखील आता पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भऱवण्यात येतील. दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 1 एप्रिलपासून सुरु झाला असून त्यांना फक्त मे महिन्यात सुट्टी असेल, असे सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापाकांनी सांगितले.
जून महिन्यापासून ऑफलाइन वर्ग सुरू
कोरोना काळामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आकलनावर परिणाम झाला असून आता पुन्हा एकदा ऑफलाइन वर्गांद्वारे प्रयत्न करून विद्यार्थ्यांना प्रवाहात आणले जाईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना फक्त मे महिन्यात सुट्टी दिली जाईल. त्यानंतर 1 जूनपासून त्यांचे पुन्हा एकदा वर्ग सुरु होतील. तसेच इतर वर्गांच्या शाळादेखल 13 जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.