आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीन चिट:राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चिट, मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सत्र न्यायालयात केला सादर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा घोटाळा 25 हजार कोटींचा असल्याचा आरोप करण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या 25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट दिली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.

हा घोटाळा 25 हजार कोटींचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. 2011 ला रिझर्व्ह बॅंकेने हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळाला बरखास्त केले होते. दरम्यान राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 जणांवर सप्टेंबर 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर करण्यात आला. यामध्ये 25 हजार कोटींच्या कर्जाचे नियमबाह्य पद्धतीने वितरन केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा कथित घोटाळा उघड झाला. यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. यानंतर याच्या चौकशीचे आदेश दिले गेले. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली होती. अशा एकूण 300 पेक्षा जास्त मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे यामध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...