आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश नाईकांना क्लीन चिट:बलात्कारप्रकरणी पुरावे सापडले नसल्याने गणेश नाईकांना क्लीन चिट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध एका महिलेने बलात्कार, तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत नोंदवलेल्या कथित दोन गुन्ह्यांमध्ये तथ्य आढळले आहे. परंतु पुरावे सापडलेले नाहीत, असे नमूद करणारा ए समरी अहवाल सादर केल्याचे नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले. नाईक यांच्याविरोधात तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक बलात्काराचा आणि दुसरा शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणात जुलै, तर दुसऱ्या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात ए समरी अहवाल सादर करण्यात आल्याचे सहायक सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...