आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरवणकरांना क्लीन चिट:गोळीबार झाला, तो त्यांनी केला नसल्याचा निर्वाळा

मुंंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट व शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच बलेस्टिक चाचणीत पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले होते, पण तो गोळीबार सदा सरवणकर यांनी केला नव्हता, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे सदा सरवणकर यांना एक प्रकारे क्लीन चिट दिली. दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातून उफाळलेल्या वादातून आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत होती.

बातम्या आणखी आहेत...