आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिसांचा निर्णय:आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी सोमय्या पिता-पुत्राला क्लीन चिट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयएनएस ‘विक्रांत’ च्या ५८ कोटी रुपयांच्या निधी अपहारप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नगरसेवक नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. सोमय्या पिता-पुत्राविरोधात याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट सांगितले. त्यामुळे या प्रकरणातून त्यांची सुटका होणार आहे.

१९७१ च्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेवर युद्धस्मारक बनवण्याच्या नावाखाली जमा केलेल्या ५८ कोटींच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता. किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

राजभवनाला निधी मिळाला नाही, हाच मोठा पुरावा : राऊत सरकार बदलल्यानंतर ज्या अनेक गोष्टी अपेक्षित असतात. हा विषय अद्याप संपलेला नाही. आयएनएससाठी पैसे गोळा झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पैसे राजभवनात गेले असे म्हणतात व राजभवन म्हणते पैसे आलेच नाहीत. हाच तर भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. मी याप्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...