आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्म पुरस्कार:भाजप, संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणुकांवर डोळा ठेवून पुरस्कारांची घोषणा

राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी ९९ नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली असताना त्यातील केवळ फक्त एकाच नावाचा विचार होणे अत्यंत दुर्दैवी असून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का, असा सवाल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले, पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारने विविध क्षेत्रांतील ९९ मान्यवरांच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यामधील केवळ सिंधुताई सपकाळ हे एकच नाव केंद्र सरकारने विचारात घेतले. त्यातही सिंधुताईंचे नाव हे पद्मभूषण या श्रेणीसाठी राज्य सरकारने पाठवले होते. परंतु त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यातही महाराष्ट्रातील केवळ सहा जणांनाच पुरस्कार दिला आहे. सिंधुताई सपकाळांना पद्मभूषण नाकारणाऱ्या केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये पद्मभूषण पुरस्कारांसाठी रजनीकांत श्रॉफ या युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या मालकाची निवड केली आहे. सदर कंपनीत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे संचालक म्हणून कार्यरत आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणुकांवर डोळा ठेवून पुरस्कारांची घोषणा
ज्या राज्यांत निवडणुका आहेत त्या राज्यांतले आणि भाजपशासित राज्यातील जास्त लोकांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत हा योगायोग समजता कामा नये. आसामसारख्या छोट्या राज्यालाही या वर्षी निवडणुका असल्याने पद्म पुरस्कारांमध्ये मोठे प्रतिनिधित्व मिळाले आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे भाजप आणि संघ परिवाराशी जवळीक हाही एक नवा निकष या पुरस्कारांबाबत लागू करण्यात आला आहे असे दिसते, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...