आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा रद्द:साताऱ्यातील खराब वातावरणामुळे फिरले माघारी; सातारा आणि कोयनानगरमध्ये जोरदार पाऊस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापुराचा आढवा घेतल्यानंतरच नुकसान भरपाईची घोषणा

राज्यात मुसळधार पावसामुळे महापुराचा तडाखा बसलेल्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आज मुख्यमंत्र्यांनी आयोजित केला होता. दरम्यान, ते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार होते. परंतु, सातारा आणि कोयनानगरमध्ये मुसळधार पाऊस सुर असल्याने हवामान खराब आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच हेलिकॉप्टर कोयनानगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकले नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्ह्यातील दौरा रद्द करण्यात आला आहे. ते आता आपल्या हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे रद्द झाला दौरा
राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सातारा आणि कोयनानगरमध्ये सध्याही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरण खराब झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी 11 च्या सुमारास पुण्याहून कोयनानगरकडे रवाना झाले होते. ते साडे अकरा वाजेच्या सुमारास कोयनानगरातील हेलिपॅडवर पोहचणार होते. परंतु, वातावरण खराब असल्याने त्यांचा हेलिकॉप्टर लँड होऊ शकले नाही. त्यामुळे ते परत त्याच हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना झाले आहे. या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

महापुराचा आढवा घेतल्यानंतरच नुकसान भरपाईची घोषणा
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेत आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसान भरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल असे ते म्हणाले होते.

धोकादायक गावातील लोकांचे पुनर्वसन करणार
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अशा घटना पावसाळ्यात नेहमी घडतच असल्याचे अनुभव येत आहे. त्यामुळे आदी त्या भागांचे आराखडा तयार करण्यात येईल. जेणेकरुन ऐन पावसाळ्यात या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल असे ते म्हणाले होते.

एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल
राज्यातील वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करण्यासाठी काम केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...