आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केले.
'राजगृह' ऐतिहासिक वारसा
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इंदू मिल येथील बाबासाहेबांचे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. नुकतीच आम्ही येथील कामाची पाहणी. जगाला हेवा वाटेल, असे हे स्मारक बनवू. तसेच, बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले राजगृहदेखील आपला ऐतिहासिक वारसा आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू, छायात्रित्र, अभ्यासाची खोली आहे. बाबासाहेबांचा हा सर्व ठेवा जोपासला जाईल.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सुरूवातीला बाबासाहेब राहत असलेले लोअर परळ येथेही स्मारकाबाबत पाहणी केली जाईल. बाबासाहेबांच्या सर्व आठवणी व इतिहास जपण्याचे काम हे सरकार करेल.
घटनेमुळे सामान्य सर्वोच्च पदी
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज या महामानवामुळेच आपण जगात ताठ मानेने उभे आहोत. बाबासाहेबांनी घटनेने सर्वसामान्यांना अधिकार प्रदान केले. जगण्याचे हक्क दिले. या अधिकारामुळेच सर्वोच्च अशा पदावर जाऊन राज्याची व देशाची सेवा करण्याची संधी अनेक लोकांना मिळाली. राज्यातदेखील एका सामान्य कुटुंबाचा मुख्यमंत्री झाला. मला राज्याची सेवा करण्याची संधी बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळाली. त्यामुळे मी बाबासाहेबांचा सदैव ऋणी राहिल.
विचारांचे तेज दिले
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महापुरूष इतिहास घडवतात. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास बदलला. दलित समाजातून शतकाचा न्यूनगंड त्यांनी घालवला. आपल्या अथांग अशा विद्वत्तेचा उपयोग दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. मानवमुक्ती हेच त्यांचे ध्येय होते. सामान्य माणूस हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. गुलामगिरीविरोधात विद्रोह करून त्यांनी या लढ्याला प्रचंड असे वैचारिक बळ मिळवून दिले. दलितांना विचारांचे तेच दिले.
वसतिगृहांची संख्या वाढवणार
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकारही बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानुसारच चालत आहे. तळागाळातील सामान्यांना विकासाची समान संधी देणारी व्यवस्था निर्माण करायची आहे. सरकार शासकीय वसतिगृहाची संख्या वाढवणार आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करणार आहे. बार्टीला आणखी सक्षम केले जाईल. दलितांनी स्वंयरोजगार उभारावा, यासाठी सरकार त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करेल.
संविधानामुळे देश प्रगतीपथावर
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाची दशा आणि दिशा बदलण्याच काम बाबासाहेबांनी केले आहे. व्यक्तीसोबत जात, धर्म, भाषा अशा कोणत्याही आधारे भेदभाव करता येणार नाही, हे बिज मंत्र देणारे संविधान बाबासाहेबांनी दिले. हे संविधान आणि लोकशाहीमुळेच आद देश प्रगती करतोय. सर्वसामान्यांनाही सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी संविधानाने दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.