आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची धुळवड:कुटुंबीयांसह साजरे केले धूलिवंदन; राज्यभरातील कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबियांसह धुळवड साजरी करण्यात आली आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी आज मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी करताना दिसून येत आहे. आपले सरकार आल्यापासून गोविंदा असो की दिवाळी की होळी सर्व जण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

कोरोनामधल्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी धुळवड राज्यभरात साजरी होत आहे. अनेक सामाजिक आणि सेलिब्रिटी धुळवड साजरी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कुटूंबासोबत धुळवड साजरी करताना दिसून आले. यावेळी त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या नातवासह त्यांनी रंगपंचमी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्निक धुळवड साजरी केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही दिली. तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांना मदत करणार

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाच्या नजरेसमोर पिके पाण्याखाली वाहून गेली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...