आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआचा कसला मोर्चा?:कोण काय बोललं, कोण कस चुकलं त्याचा एवढा गवगवा करायची गरज नाही - शहाजी पाटील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबद्दल वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीचा उद्या मोर्चा निघणार आहे. आज पुर्वसंध्येला शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी मविआवर टीका केली. ''कोण काही बोलले, कोण चुकले असेल त्याचा एवढा गवगवा कशाला करता?'' असे म्हणत ''गवगवा करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा पदवी कुणी दिली? समर्थ रामदासांनी ही पदवी दिली, शिवरायच जगातील एकमेव जाणते राजे'' असेही त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी येथे आज सायंकाळी एका सभेत संबोधन करताना शहाजी पाटील बोलत होते.

गवगवाच करायचा तर..

शहाजी पाटील म्हणाले, मविआचा मोर्चा उद्या निघणार आहे, कशाचा मोर्चा, कोण चुकले असेल त्याचा एवढा गवगवा करायची गरज नाही. गवगवाच करायचा तर छत्रपती शिवरायांना जाणता राजा उपाधी कुणी दिली? रामदास स्वामींनी दिली.

रामदास स्वामींनी जाणता राजा म्हटले

शहाजी पाटील म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हटले. जगाच्या पाठीवर मोठमोठे नेते झाले, सम्राट, बादशहा, लोकशाहीने राष्ट्राध्यक्ष झाले, काहीही झाले असतील पण जाणता राजा ही उपाधी केवळ पृथ्वीतलावावर छत्रपती शिवाजी महाराज यांनाच मिळाली.

जगाने मान्य केले

शहाजी पाटील म्हणाले, जाणता राजा ही पदवी शिवरायांशिवाय कुणालाही मिळाली नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत एकच जाणता राजा आहे ते म्हणजे छत्रपती शिवराय. हे जगाने मान्य केले. जगाच्या इतिहासकारांनी नंबर एकची पदवी छत्रपती शिवाजी महाराज यांना लंडनमध्ये दिडशेवर्षांपूर्वी बहाल केली.

उद्धव ठाकरेंना घरी बसवलं

शहाजी पाटील म्हणाले, अठरा तास घरी बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं, २२ तास करणाऱ्या माणसांना तुमच्यासमोर घेऊन आलो ही आमची चूक झाली का अजित पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण जिथे नाही तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाचशेंची नोट बघायला दिवस लागतो आणि तुम्ही कसले खोके खोके बोलता.

मविआचा उद्या मोर्चा

महाविकास आघाजीचा उद्या मुंबईत मोर्चा निघणार आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांबरोबरच काही स्वयंसेवी संस्थाही या मोर्चात सहभागी होत आहेत. गेल्या सहा महिन्यात महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव करण्याचे काम,अपशब्द वापरण्याचे काम सुरु आहे. लोकांमध्ये असंतोष आहे त्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. सीमीप्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर या महापुरुषांबद्दल जे अपशब्द वापरले गेले आहेत, त्या गोष्टीचा धिक्कार करण्याकरता, त्या लोकांना बाजूला काढण्याकरता हा मोर्चा काढण्यात येणार आहे असं अजित पवार यांनी म्हटले.

मोर्चाला परवानगी - फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मविआचा मोर्चा शांतपणे व्हावा. त्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला वाटते की, लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठीच केवळ सरकारचा हस्तक्षेप असले.

बातम्या आणखी आहेत...