आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकदिवसीय रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात मुख्यमंत्री दौरा करणार असल्याने सर्वांचे त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. यातच नाशिकचे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक शिंदेंच्या गटात दाखल होणार आहेत. यामुळे नाशिकनंतर आता रत्नागिरीत ठाकरेंना धक्का बसणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा?
रत्नागिरीतील एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री विविध पदाधिकारी, संघटनेसोबत चर्चा करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विभागांचा आढावा, गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची प्रमोद महाजन संकुलमध्ये सभा होणार आहे. सभा आटोपून मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होणार आहे.
अनेक विकासकामांचे भूमिपूजन होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंच्या हस्ते जिल्ह्यातील अनेक विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर ठाकरे गटातील नेत्यांचीही नावे असली तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाही असे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. यावेळी रिफायनरीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री काही बोलणार का नाही याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
शंभुराज देसाई यांचा शिनोळी दौरा
राज्याचे मंत्री शंभुराज देसाई सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा करणार आहेत. सीमाभाग समन्वयक समितीचे सदस्य आणि मंत्री शंभुराजे देसाई आज कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात जाणार आहेत. गेली काही दिवस राज्यातील वातावरण या मुद्द्यावरुन तापले आहे. यानंतर आता शंभुराजे देसाईंच्या या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावसह कर्नाटकाच्या काही गावात जाऊन, तिथल्या मराठी बांधवांशी चर्चा केली होती. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिनोळी गावात शंभूराज देसाई यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सभा होणार आहे. शिनोळी हे गाव महाराष्ट्रात अगदी कर्नाटक सीमेजवळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न ताजा असताना समन्वय समितीचे सदस्य असल्याने देसाई यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.