आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक राऊत यांचं टिकास्त्र:शिंदे गटानं राजकारणात हद्द पार केली असून नीच राजकारण सुरू

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटानं राजकारणात हद्द पार केली असून नीच राजकारण सुरू, अशा शब्दात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालू आहे. यंदा देखील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी केव्हाच पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी आधी परवानगी दिली, मात्र आता पलटी खाल्ली आहे. अडचणी सांगण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, भाजपकडून सेनेविरोधात षडयंत्र रचले जात आहे. ज्यांनी पहिल्यांदा अर्ज केला आहे. त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेची असली पाहिजे. जर महापालिकेने यामध्ये कुचराई केली. तर आम्हाला सुद्धा न्यायप्रक्रिया पार पाडावी लागेल.

ते म्हणाले की, दोन गट हे फडणवीसांसाठी आहेत. आमच्यासाठी आमची शिवसेना एकसंघ आहे. खोटे बोल पण रेटून बोल असे राजकारण सध्या ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडून सुरू आहे. सुरतपासून गुवाहटीपर्यंत मिळवलेले खोके आता खर्च केले जात आहे. उधळपट्टी पैशाची होणार आहे, हे जनतेला माहिती आहे. पण, हरामाच्या पैशांला स्पर्श करण्याचे काम गणेशभक्त करणार नाहीत.

दसरा मेळावा हायजॅक
शिंदे गटाकडून आता शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक केला जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यास शिवसेनेला अद्याप मुंबई पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची जागा मिळावी, यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला होता.

बातम्या आणखी आहेत...