आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जनतेशी संवाद:हळू-हळू आपण राज्यातील सगळा कारभार सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत- उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्य सरकारकडून लॉकडाउन-5 बाबत नवीन नियमावली जारी

देशातील वाढत्या कोरोना संक्रमणामुळे देशातील लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन-5 हा एक जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. केंद्र सरकारने कालय याबाबत घोषणा आणि नियमावली जाहीर केली आहे. आज राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन-5 बाबत आपली नियमावली जारी केली. त्याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित करत आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'हळू-हळू आपण राज्यातील सगळा कारभार सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोरोनाशी आपला लढा सुरुच आहे. अद्याप गर्दी होईल अशा कार्यक्रमांना परवानगी दिली नाहीये. बाहेर फिरण्यास परवानगी आहे, मात्र अंतर ठेवूनच बाहेर फिरा. या अंतरामुळेच आपण करोनाला एका अंतरावर ठेवणार आहोत. बाहेर गर्दी अजिबात करायची नाही. झुंबड उडाली तर बंद करण्याची वेळ यायला नको. महाराष्ट्रात शिस्तीचे उदाहरण घालून द्या की देशाने आपले उदाहरण समोर ठेवले पाहिजे. '

'लॉकडाउन करणे हे विज्ञान असेल तर लॉकडाउन उघडणे ही एक कला आहे. पावसाळा येतो आहे, पाऊस पडला की शेवाळ साठतं. त्या शेवाळावरुन आपला पाय घसरू नये म्हणून काळजी घेतो. याचप्रमाणे आता आपल्याला पुढेही काळजी घ्यायची आहे. गेल्या आठवड्यात मी संपूर्ण यंत्रणेची बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. करोनासोबत जगायला शिका हे आपण सगळ्यांकडून ऐकतो आहोत. ते जगायचं म्हणजे काय? तर मास्क लावणे अपरिहार्य आहे. तसेच शिस्त ही प्रत्येकाने पाळायचीच आहे.'

मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

 • इतर देशांप्रमाणे आपल्याला उघडझाप करायची नाही
 • एकदा उघडलेली गोष्ट बंद करायची नाही
 • मास्क अनिर्वाय आहे, हात धुणे महत्वाचे आहे, कंटाळा करु नका, चेहऱ्याला हात लावू नका
 • येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता, आपली यंत्रणा सज्ज
 • पुढील चार दिवस मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये
 • पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यावर मी सर्वांची बैठक घेतली, त्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे
 • बाहेर फिरताना जितके अंतर ठेऊ, तितकेच कोरोनापासून अंतर ठेवा
 • मित्र-आप्तेष्ट यांना भेटा, पण अंतर राखून नमस्कार करा
 • तीन तारखेपासून घराबाहेर व्यायाम करण्यास मुभा

 राज्य सरकारकडून लॉकडाउन-5 बाबत नवीन नियमावली जारी

मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाउन होता. यात अनेक गोष्टींवर निर्बंध होते. पण, आता केंद्र सरकारने काल अनलॉकच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल लॉकडाउन-5 किंवा अनलॉक-1 बाबत नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार 8 जूनपासून धार्मिकस्थळे, हॉटेल्स, मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातच आज महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउन-5 बाबत आपली नियमावली जारी केली. यात केंद्राने सवलती दिलेल्या काही गोष्टींवर राज्यात अद्याप बंदी कामय राहणार आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार आणि काय बंद राहणार?

 • 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक.
 • कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार.
 • सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी.
 • सार्वजनिक मैदानेही खुली होणार.
 • समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी.
 • धार्मिक स्थळे बंदच राहणार.
 • स्डेडिअम बंदच राहणार.
 • फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश.
 • लांबच्या प्रवासावर बंदी.
 • शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार.
 • मेट्रो बंदच राहणार.
 • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.
 • सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल, बंद राहतील.
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.
 • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्तरॉ बंदच राहतील.
 • सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत.
0