आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान अंदाजासाठी:औरंगाबादेत स्वतंत्र डॉपलर रडार उभारा, पंतप्रधान मोदींकडे मुख्यमंत्र्यांची मागणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत जाहीर करा

मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र ३ x डॉपलर रडार यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. या वेळी महाराष्ट्रात विशेषत: ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे ‘इंटरस्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम’ उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संकटात केंद्र पाठीशी : मोदी आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय आहे. संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देऊन मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून निर्णय घेण्याची सूचनाही मोदींनी केली.

महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत जाहीर करा
निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ५ ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...