आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोशी-शिंदे भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया:म्हणाले- त्यांनी कधीच विश्वासघात केला नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून निष्ठा शिकून घ्यावी!

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''लिलाधर डाके, मनोहर जोशी हे आमचे निष्ठावंत नेते आणि कट्टर शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांमागे कडवट प्रसंगात ठाम उभे होते. अशा निष्ठावंत नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले त्यांनी या शिवसेनेच्या नेत्याकडून निष्ठा शिकावी असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज लगावला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

त्यांनी विश्वासघात कधीच केला नाही

राऊत म्हणाले, सत्ता आणि पदासाठी लिलाधर डाके आणि मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षासाठी कधीच विश्वासघात केला नाही. या नेत्यांना भेटून येताना त्यांच्याकडून निष्ठाही घेऊन यायला हवी होती.

तुमची ताकद दाखवा

राऊत म्हणाले, शिवसेना येथेच आहे, ते कोणत्या नियुक्त्या आणि कोणत्या पक्षासाठी नियुक्त्या करीत आहेत. भातुकलीचा पोरखेळ सुरु आहे त्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही. कोणता पक्ष त्यांचा संबंध काय? जो पक्ष बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी वाढवला. ज्या पक्षाच्या सावलीखाली आपण मोठे झालो, फळे चाखली पण आज ते बाजूला झाले पण तुम्ही तुमची ताकद दाखवा.

कुणाचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न

राऊत म्हणाले, राज्यात सत्तांतर होईल या मतावर मी ठाम आहे. हे स्वप्न असले तरी मी ठाम आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते कुणाला मुख्यमंत्री व्हायला आवडते. आम्हाला राज्यात शिवसेनेची सत्ता आणायची आहे पण दगाबाजी करुन ती आम्ही आणणार नाही.

त्या मुद्द्यावर टीका कशाला?

राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरे करणे चांगले आहे. राज्यात शेती, पीकांचे नुकसान झाले, घरांची पडझड झाली पण राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही, दुसरीकडे दिल्लीवारी मुख्यमंत्र्यांची सुरु आहे त्यातून वेळ काढून जर ते दौरे करत असतील तर त्यावर टीका करण्याची गरज नाही.

निष्ठेचेही धडे घ्या

राऊत म्हणाले, शिवसेनेचे वरिष्ठ नेते लिलाधर डाके, मनोहर डाके हे आमच्या पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. त्यांनी संकटकाळात शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. जर मुख्यमंत्री अशा नेत्यांचे आशिर्वाद घ्यायला जात असतील तर त्यांनी वादळामध्ये साथ देणाऱ्या लिलाधर डाके आणि मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी निष्ठा शिकावी.

दिल्ली अन् गल्लीही ओळखते

राऊत म्हणाले, ईडीचे समन्स दोनवेळा आले पण परत आल्यावर पाहू आम्ही कायद्याचे पालन करीत आहोत माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत काय हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहित आहे.

बातम्या आणखी आहेत...