आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • CM Should Do Justice To The Post, Shinde Upset About Whether The Chair Will Remain Stable Or Not; It Is Felt From Their Behavior, Body Language Vidya Chavan

विद्या चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांवर टीका:म्हणाल्या- शिंदे किस झाड की पत्ती, खुर्ची अट्टहासाने मिळवली, स्थिर राहणार नाही

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खुर्ची स्थिर राहिल की नाही यामुळे शिंदे अस्वस्थ; त्यांच्या वागण्यातून, देहबोलीतून ते जाणवते. मुख्यमंत्री शिंदेंनी पदाला न्याय द्यावा, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.

शिंदे किस झाड की पत्ती

भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या खाद्यावर बसून पक्ष वाढवला. फडणवीस हे कुशल राजकारणी आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे किस झाड की पत्ती आहे, भाजप आज काम झाल्यावर उद्या शिंदेंना झटकल्याशिवाय राहणार नाही, असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला आहे. तर कामाख्या देवीला जात स्त्री जातीचा अपमान बंद करावा असे ही त्यांनी म्हटले आहे.

विद्या चव्हाण काय म्हणाल्या?

चव्हाण म्हणाल्या की, मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती अजून तरी इतकी अस्वस्थ बघितलेली नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची भाजपच्या मदतीने अट्टहासाने मिळवली. परंतु आता ही खुर्ची स्थिर राहील की नाही. ती अस्वस्थता त्यांच्या वागण्यातून, देहबोलीतून जाणवते. बुडत्याला का काडीचा आधार म्हणून येथे देवाला जा.. कामाख्याला जा, ज्योतिषकडे जा.. असे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली.

विश्वासार्हता राहत नाही

माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या की, यापेक्षा मुख्यमंत्री पदाचे महत्त्व जाणते चांगल काम करा. लोकं पुन्हा निवडूण देतील. पण असे न करता लोकांना ढिगभर आश्वासन देयची आणि कोणतीच पूर्तता करायची नाही. यामुळे विश्वासार्हता राहत नाही. भविष्य बघण्यापेक्षा किंवा पुन्हा कामाख्या देवीला जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाला योग्य न्याय द्यावा. असे मत यांनी व्यक्त केले.

जादूटोणा महाराष्ट्राला मान्य नाही

विद्या चव्हाण म्हणाल्या की, कामाख्या देवी जादूटोणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सारखे असे त्या ठिकाणी जाणे व जादूटोणा यांसारख्या गोष्टीला प्रोत्साहन देणे योग्य नाही. मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती असे जादूटोणा, मंत्र तंत्र असे करत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला ते मान्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...