आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. “कोरोनाची लस आल्यानंतरही मास्क घालणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. वाढत्या गर्दीमुळे युरोपात पुन्हा आजवरचा सर्वात कडक लॉकडाउन झाला. सार्वजनिक ठिकाणी येता जाताना मास्कचा वापर करावा, नवीन वर्षाचे स्वागत करताना सावध राहा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील मुद्दे
> माझ्या मुंबईबाबत मी अहंकारी, महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी का नसावं? 30 हेक्टरमधील घनदाट झाडांची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरणार नाही, कमी गर्दीच्या वेळेत मेट्रो पार्क करणे (स्टेबलिंग लाईन) आवश्यक
> विकास करत असताना नवनवीन गोष्टी येतात. विकासकामांच्या आड आलेलो नाही, मुंबईतील मेट्रोच्या कामांची पाहणी करायला जातोय, कामाची प्रगती बघतोय. कोस्टल रोड हे आमचे स्वप्न.
> सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. केंद्राकडून धीम्या गतीने पैसे येत आहेत, पण रडत बसलेलो नाही. नैसर्गिक आपत्तींचा सामना केला.
> सरकार पडेल यासाठी अनेक जण डोळे लावून बसले होते. पण सरकारने कोरोनाचा धोका, राजकीय आरोप सांभाळत आणि विकास करत महाविकास आघाडी सरकारने 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण केले. असा टोला भाजपला लगावला.
> नवीन वर्षाच्या स्वागताला काळजी घ्या, लग्नात गर्दी वाढत आहे, फोटो काढताना मास्क काढला जातो, अंतर पाळा, सावधानता बाळगा.
> युरोपातील देशांमध्ये चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. युरोपात कोरोनाने रुप बदलले आहे, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकले पाहिजे, परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत.
> लस आल्यानंतरही मास्क बंधनकारक असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, युरोप-इंग्लंडमध्ये आजवरचा सर्वात कडक लॉकडाऊन, कोरोनाने अवतार बदलल्यामुळे ही वेळ आली आहे.
> प्रत्येक पावलावर सावध राहण्यास सांगणं कुटुंबप्रमुख म्हणून कर्तव्य, अनेक गोष्टी उघड्या झाल्या, गर्दी आणि रहदारी वाढल्याने हिवाळ्याच्या साथी येण्याची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.