आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अचानक लाॅकडाऊन लावणे जसे चुकीचे होते तसेच अचानक लाॅकडाऊन हटवणे चुकीचे आहे, असे सांगत राज्यात हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर आणले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. फेसबुक लाइव्हद्वारे ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या वेळी राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ३१ मेनंतरही राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे उठवले जाणार नाही असेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कारोनाच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यासाठी भाजपने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांची जंत्री सादर केली. मेअखेरपर्यंत केंद्र शासनाने महाराष्ट्रात दीड लाख रुग्ण होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आजघडीला राज्यात ४७ हजार १९० रुग्ण आहेत, असे सांगून सरकारच्या उपाययोजनांची त्यांनी पाठराखण केली.
रोज ८० रेल्वेची मागणी, ३० उपलब्ध
सुमारे ७ लाख मजुरांना ४८१ रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात पाठवले. राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठीचा १०० टक्के खर्च केले. राज्याची रोज ८० रेल्वे सोडण्याची मागणी आहे. पण केवळ ३० ते ४० रेल्वे उपलब्ध करून देण्यात येत आहेत अशी टीका त्यांनी केंद्रावर केली.
मानवता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही : योगी
महाराष्ट्रासाठी घाम गाळणाऱ्या उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना - काँग्रेस सरकारने छळच केला. लॉकडाऊनमध्ये त्यांना धोका दिला. त्यांना वाऱ्यावर सोडून घरी जाणे भाग पाडले. या अमानुष वागणुकीबद्दल माणुसकी कधीच उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.