आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस:पीएम मोदींनी 'धाकट्या भावाला' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, उद्धव ठाकरेंना पंतप्रधानांनी पाठवले पत्र; सोशल मीडियावरही पोस्ट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असताना पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी उद्धव यांचा उल्लेख धाकटा भाऊ असा केला होता. (फाइल फोटो)
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री 12 वाजता मुख्यमंत्र्यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, महायुतीची सत्ता असताना पंतप्रधानांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांचा धाकटा भाऊ असा उल्लेख केला. यासोबतच, मोदींनी ट्विट करून सुद्धा मुख्यमंत्र्यांना सदीच्छा दिल्या आहेत. ठाकरेंनी आपल्या वयाची साठी पूर्ण केली. तसेच शुभचिंतकांना या वर्षीच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले. तसेच आपला वाढदिवस साजरा करणार नसून तो कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्याला समर्पित करणार असे ते म्हणाले आहेत.

भूतकाळातील आठवणींना उजाळा, भविष्यातील रूपरेषा ठरवण्याचा दिवस

उद्धव यांना शुभेच्छा देताना मोदींनी ट्विट केले की “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो.” यासोबतच, पीएम मोदींनी एक पत्र पाठवले. “वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो. त्याबरोबरच हा दिवस भविष्याची रूपरेषा निश्चित करण्यासाठी एक संधी असते. आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल असा मला विश्वास आहे. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे.” उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असताना पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी उद्धव यांचा उल्लेख धाकटा भाऊ असा केला होता. परंतु, 2019 च्या निवडणुकीत अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून वाद झाला आणि भाजप-शिवसेना महायुती तुटली.

अजित पवारांनी रात्री 12 वाजता दिल्या अनोख्या शुभेच्छा